Tuesday, June 26, 2007

bharatmata

दुधाचे कर्ज
ती एक भयाण रात्र होती.सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता.आजुबाजुला कुणीच दिसत नव्हतं.रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज नीरव शांततेला चिरत होता.मी इकडेतिकडे लक्ष विचलीत न करता निमुटपणे चालतं होतो.इतक्यात कुणाएका स्त्रिच्या हुंदक्यांचा आवाज माझ्या कानावर पडला.मी इकडेतिकडे पाहिलं,पण कुणीचं दिसतं नव्हतं.मी झपाझप पाउलं टाकू लागलो.इतक्यात पिंपळाच्या झाडाखाली शुभ्र वस्त्रामधील एक स्त्री माझ्या नजरेस पडली.कसल्याशा जोखडात ती वेढलेली होती.चेहरा काळजीने काळवंडलेला होता.अंग रक्तानं माखलं होतं.डोक्यावरं कटेरी मुकुट चढवलेला होता.तिच्या डोळ्यांतील अश्रु टपटप खाली पाडत होते.
माते कोण आहात आपण आणि इथे काय कारत आहात? मी विचारले.बाळा!मला ओळखलं नाहीस.मी आहे भारतमाता.गेली पन्नास वर्ष मी इथे बांधली गेलेली आहे.त्याआधीही होते पण तेव्हां एक तर समाधान होतं की जुलूम करणारे परके आहेत.पण आत्ता मात्र सगळेचं आपलेचं आहेत.आपलेचं दात आणि आपलेच ओठ.कुंपणच शेत खायला लागलं तर दाद तरी कोणाकडे मागयची.स्वातंत्र्याआधी माझ्या हाकेला ओ देत माझे सुपुत्र माझ्यापुढे उभे राहिले.त्यांचे रक्त आजही मझ्या धमण्यांत वाहत आहे.पण त्यांच्या पुत्रांनी त्याची काडीमात्र किंमत ठेवली नाही.
आज स्वतःचे डोळे मिटून राजरोसपणे पापं करतांना त्यांना हे कळतं नाही की ते कुणाची फसवणूक करताहेत,आपल्या मात्रूभुमीची की स्वतःच्या मनाची.आज सरकारी कचेरीत नीतिमत्तेचा बाजार मांडला जातोयं.प्रामाणिकपणा कवडींच्या भावाने विकला जातोयं.बेजवाबदारपणाचा नंगानाच चालू आहे.माणुसकीचं भरचौकात वस्त्रहरण होतयं.सर्वसामान्यांच्या मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांच्याच पाठीत सूरा खुपसत त्यांच्या पैशावर डल्ला मारत आहेत.सामान्य माणूस सामाजिक पिळवणूकीचा केंद्रबिन्दू बनत चालला आहे.जो तो आपल्या पदाचा गैरवापर करुन स्वतःच्या तुडूंब्या भरण्यात मग्न झालेला आहे.जिहादच्या नावाखाली सैतान निरपराध लोकांचे बळी घेत आहेत.देशाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगण्याची एकही संधी दवडली जात नाही.निदर्शनांच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची मोडतोड चालू आहे.जातीधर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या भावनांशी खिलवाड होत आहे.देशभक्ती तर सोडाच पण लोकांच्या मनातील माणूसचं मरून गेला आहे. देवा! हेच दाखवायचं होतं तर कशाला मला स्वातंत्र्य दिलं.हे असं किती दिवस चालणार? या भारतभूमीत माझे अश्रू पुसणारं कुणीच नाही काय?
बाळांनो!आत्तातरी जागे व्हा!तुमची मात्रूभुमी तुमच्याकडे तुम्हाला पाजलेल्या दुधाच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब मागते आहे.मला क्रांती हवीय,सशस्त्र क्रांती! स्वास्तिक
e-mail id: swastikpatriot@gmail.com orkut community: The Indian Patriot
Do join me.